उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

            मुंबई, दि. १२ : राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख एवढ्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. 

000

दीपक चव्हाण/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here