राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार,मराठा आरक्षणासाठी सांगलीतील गावकऱ्यांचं ठरलं

राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार,मराठा आरक्षणासाठी सांगलीतील गावकऱ्यांचं ठरलं

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्यानं राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध भागातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सांगली जिल्ह्यात आज बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध प्रकारे आंदोलन करुन मराठा आरक्षणाची मागणी पुढं केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील एका गावानं राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तर, आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेतेमंडळींना धनगावात प्रवेश मिळणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय नेते मंडळींना पलूस तालुक्यातील धनगाव गावात प्रवेश करू दिला जाणार नसल्याचा,तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धनगाव मधील सकल मराठा बांधवांनी गावातून निषेध फेरी काढली. शिवतीर्थावर सर्वांनी एकत्रित आलेल्या फेरीचे सभेत रूपांतर झाले.सरपंच सतपाल साळुंखे,सोसायटीचे चेअरमन दिपक भोसले,दत्ता उतळे,रविंद्र साळुंखे,आनंदराव उतळे,अरविंद साळुंखे,कुमार सव्वाशे,राज साळुंखे,राज साळुंखे,जयदीप यादव,दत्ता उतळे,रविंद्र साळुंखे आदींनी आपल्या मनोगतातून मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नागरिक आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचा निर्धार व्यक्त केला.
भारत विरुद्ध इंडिया वादात सुनील गावस्करांची उडी; म्हणाले, चांगली गोष्ट, मात्र बदल केला तर तो….
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना प्रवेश करून द्यायचा नाही.येथून पुढे येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर नागरिक बहिष्कार घालणार असल्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला.सकल मराठा समाजाच्या वतीने सरपंच सतपाल साळुंखे यांना निवेदन दिले.ग्रामपंचायत आणि सकल मराठा समाज राज्याचे मुख्यमंत्री,सर्व मंत्री,खासदार,आमदार,प्रशासकीय अधिकारी,निवडणूक आयोग,पोलीस प्रशासनास निवेदन दिलं जाणार आहे.

१०५ आमदार असलेल्यांची परिस्थिती काय? त्यांच्या डोळ्यात फक्त… सतेज पाटलांनी डिवचलं

यावेळी पोलीस पाटील मनिषा मोहिते, सुरेश साळुंखे,अनिल साळुंखे,रमेश पाटील,शरद साळुंखे,सुनिल भोसले,सुनिल मोहिते,माणिक तावदर,शैलेश साळुंखे,सौरभ पाटील,प्रशांत साळुंखे,शैलेश साळुंखे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासन काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागलं आहे.

शिंदे सरकारने मराठ्यांसाठी GR काढला, पण जरांगे पाटील ‘सरसकट’वर अडले; उपोषणाबाबत मोठी घोषणा!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here