क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

            मुंबई, दि. ५ : विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

             सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते सहकुटुंब गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

            समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत. एक लाख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

            पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासन शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. शिक्षक हा यातील महत्त्वाचा घटक आहे. ते ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने पालकांनंतर गुरूजनांना महत्व दिले जाते. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचे शासनाचे ध्येय असून शिक्षणाचे महत्त्व जोपासण्यासाठी शासनामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवून यात अधिक योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारचे राज्याला पाठबळ असून त्या माध्यमातून राज्यात सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षण विभाग आणि शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे. त्यामुळे शिक्षणाकडे भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे काम बलशाली देश घडविण्यामध्ये सहाय्यभूत ठरले पाहिजे, तसेच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे, असे सांगून यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अम्बॅसेडर ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांना दिलेल्या पुरस्कारांमुळे त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळते असे सांगून शिक्षकांना यापुढील काळात स्वत:ला सतत अपडेट आणि अपग्रेड करीत रहावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

            श्री.पवार म्हणाले, राज्य शासन सर्वाधिक खर्च शिक्षण क्षेत्रावर करीत आहे. हा खर्च सत्कारणी लागला पाहिजे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता, आनंददायी वातावरण आवश्यक असते. यासाठी उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामे करण्याचाही शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती करीत आहे, याचे श्रेय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना असून त्यांच्या नावे दिला जाणाऱ्या पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील भिडे वाडा येथे सावित्रीबाईंचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी प्रगतीशील भारत घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून वाचायला शिकवणारा शिक्षक समाजाला घडवतो आणि वाचवतो अशा शब्दांत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. समाजात शिक्षकांना विशेष दर्जा असून विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागा असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविणार – दीपक केसरकर

            पुढची पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले. जनगणना आणि निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे विभागाच्या परवानगीशिवाय लादले जाऊ नये यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांचे मुख्यालय किती किलोमीटर अंतरापर्यंत असावे हे देखील लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उद्योगांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी वापरता येईल का याबाबत विभागामार्फत प्रस्ताव देण्यात आला असून शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पाच ते दहा वर्षांसाठी शाळांमधील सुविधांच्या विकासाची जबाबदारी उद्योगांकडे देता येईल, असे त्यांनी सांगितले.

            शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने 61 हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्यात आला, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली, शिक्षकांच्या सतत होणाऱ्या बदल्या थांबविण्यात आल्या, शिक्षण सेवक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आदींच्या मानधनात तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली. त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पायमोजे शासनामार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडविण्यात आणि सक्षम नवीन पिढी घडविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे शिक्षण प्रणालीत असलेले शिक्षकांचे महत्व अधोरेखित करून शिक्षक पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेची माहिती दिली.

 

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022-23 साठी निवड झालेले शिक्षक – प्रवर्गनिहाय यादी

प्राथमिक शिक्षक

श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा, चेंबूर मुंबई; डॉ.पूनम दीपक शिंदे, राजर्षी शाहूनगर हिंदी शाळा, धारावी, मुंबई; श्रीमती सीमा कृष्णकांत तायडे, मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी व्हिलेज, मालाड, मुंबई; डॉ. नेहा निलेश संखे, मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक चार, मिरे, जिल्हा ठाणे; संदीप दत्तात्रेय वारगे, जिल्हा परिषद शाळा हटाळे, जिल्हा रायगड; श्रीमती वरूणाक्षी भारत आंद्रे, जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३, जिल्हा पालघर; श्रीमती माधुरी राजेश शेजवळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे; वैभव विठ्ठल पोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, जिल्हा पुणे; लक्ष्मीकांत एकनाथराव इडलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव, जिल्हा अहमदनगर; बाळासाहेब पुंडलिक बोडखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2, जिल्हा सोलापूर; श्रीमती नलिनी बन्सीलाल अहिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर, जिल्हा नाशिक; गोकुळ त्र्यंबक पाटील, जिल्हा परिषद निकुंभे, जिल्हा धुळे; पंकज गोरख भदाणे, जिल्हा परिषद शाळा बोडीपाडा, जिल्हा नंदुरबार; डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा कंडारी, जिल्हा जळगाव; सचिन कुंडलिक देसाई, विद्या मंदिर बशाचामोळा, जिल्हा कोल्हापूर; धन्यकुमार प्रल्हाद तारळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदने नायकुडे वस्ती, जिल्हा सातारा; प्रसाद राजाराम हसबनीस, जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, जिल्हा सांगली; लक्ष्मण सहदेव घाडीगावकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी, जिल्हा रत्नागिरी; दीपक तानाजी डवर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. विनोद पांडुरंग शिनकर, श्री सरस्वती जीवन प्रशाला औरंगपुरा, औरंगाबाद; निलेश नंदकुमार जोशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव, जिल्हा जालना; अण्णासाहेब अशोक घोडके, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी, जिल्हा बीड; योगेश बळीराम ढवारे, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू, जिल्हा परभणी; शंकर देवराव लेकुळे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढुर, जिल्हा हिंगोली; डॉ. सतीश नारायणराव सातपुते, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शासकीय वसाहत, लातूर; दीपक गुरुबसआप्पा भांगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव, जिल्हा नांदेड; विक्रम बलभीमराव पाचंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी, जिल्हा उस्मानाबाद; श्रीमती विजया संजय कोकमवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरी, जिल्हा नागपूर; खुशाल किसन डोंगरवार, पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी, जिल्हा भंडारा; परमानंद रामलाल रहांगडाले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना, जिल्हा गोंदिया; संतोष दामोदर नन्नावार, लोक विद्यालय तळोधी, जिल्हा चंद्रपूर; सुजय जगदीश बाछाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, जिल्हा गडचिरोली; अंकुश जगन गावंडे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दाभा, जिल्हा अमरावती; उमेश हिम्मतराव सराळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवाडा, जिल्हा अकोला; संतोष कान्होजी पट्टेबहादूर, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कुरळा, जिल्हा वाशिम; सुरेश बन्सी उतपुरे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घिरणी, जिल्हा बुलढाणा; संदीप मधुकरराव कोल्हे,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी, जिल्हा यवतमाळ.

माध्यमिक शिक्षक

श्रीमती मनीषा महेंद्र शिंदे, स्वामी शामानंद हायस्कूल भटवाडी, घाटकोपर; डॉ. हेमाली प्रदीप जोशी, द बोरिवली एज्युकेशन सोसायटी, आरसी पटेल हायस्कूल, बोरिवली; डॉ. स्वाती जयदीप खैरे, द ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, विलेपार्ले; श्रीमती शमा खलीकुज्जमान तारापूरवाला, अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल, भायखळा; अविनाश मुरलीधर कुलकर्णी, पुणे विद्यार्थीगृहाचे विद्या भवन हायस्कूल नेरूळ, नवी मुंबई; राजेंद्र बाजीराव पालवे, सु. ए. सो. चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, जिल्हा रायगड;

सचिन दगडू पाटील, पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, जिल्हा पालघर; संपत माणिक गर्जे, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी, पुणे; श्रीमती हर्षा बाळकृष्ण पिसाळ, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन, पुणे; मंगेश गुलाब कडलग, रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ, जिल्हा अहमदनगर; तानाजी रामचंद्र माने, शरदचंद्र पवार प्रशाला, अवंतीनगर, जिल्हा सोलापूर; रावसाहेब खंडेराव जाधव, श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस, जिल्हा नाशिक; संजय दगाजीराव पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे, जिल्हा धुळे; रवींद्र अरूण गुरव, नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिर तळोदा, जिल्हा नंदुरबार; डॉ. सीमा भास्कर सैंदाणे, लाडकुबाई विद्या मंदिर भडगाव, जिल्हा जळगाव; सुधीर आप्पया आमणगी, माध्यमिक विद्यालय कसबा आरळे, जिल्हा कोल्हापूर; डॉ. शुभांगी तानाजी कुंभार, जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये, जिल्हा सातारा; प्रशांत प्रकाशराव चव्हाण, क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी, जिल्हा सांगली; जयसिंग माणकू पाटील, बॅ. नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज, हर्चे, जिल्हा रत्नागिरी; श्रीमती सुषमा प्रवीण मांजरेकर, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. संतोष पांडुरंग भोसले, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद; कल्याण नरसिंगराव सोळुंके, मत्स्योदरी विद्यालय अंबड, जिल्हा जालना; महेश चंद्रकांत गाडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ताडसोन्ना, जिल्हा बीड; श्रीमती छाया उमाजी गायकवाड, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, परभणी; अशोक हनुमंतराव सुरवसे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली; डॉ. संदीपान गुरूनाथ जगदाळे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर; शेख इरफान अहमद मोहम्मद अशरफ, जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव, जिल्हा नांदेड; भैरवनाथ खंडू कानडे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय चिकुंद्रा, जिल्हा उस्मानाबाद; डॉ. ज्योतीमणी रॉक्यू, दीनानाथ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज धंतोली, नागपूर; युवराज दयाराम खोब्रागडे, जिल्हा परिषद हायस्कूल पालंदुर, जिल्हा भंडारा; महेंद्र भूवराज सोनेवाने, शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव, जिल्हा गोंदिया; श्रीमती स्मिता अनिल चिताडे, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर; श्रीमती जयश्री विजय खोंडे, धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी, जिल्हा गडचिरोली; गणेश जानराव मस्के, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा; अतुल रमेशराव पडोळे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुर्जना घाट, जिल्हा अमरावती; बबलू श्रीराम तायडे, जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी, जिल्हा अकोला; डॉ. संतोष दामोदर पेठे, यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळाबा, जिल्हा वाशिम;

श्रीमती सुवर्णा नंदकिशोर कुलकर्णी, आदर्श विद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा; साईनाथ मारोतराव चंदापूरे, श्री गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड, जिल्हा यवतमाळ.

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक

बापू शंकर ढोडरे, जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचापाडा, जिल्हा ठाणे; शरद महादेव नागटिळक, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालेगाव, जिल्हा रायगड; संजय हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यामंदिर हमरापुर, जिल्हा पालघर; संतोष रामचंद्र थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे, जिल्हा पुणे; नरेंद्र खंडू राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थाचीवाडी, जिल्हा अहमदनगर; श्रीमती माधुरी केवळराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे, जिल्हा नाशिक; विलास शिवाजीराव जमदाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी, जिल्हा नाशिक; श्रीमती वैशाली प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषद शाळा धोंगडे दिगर, जिल्हा धुळे; श्रीमती रोहिणी गोकुळराव पाटील, जिल्हा परिषद मराठी शाळा लोथ, जिल्हा नंदुरबार; अनिल शिवाजी माळी, जिल्हा परिषद शाळा वरुळ, जिल्हा नंदुरबार; श्रीमती कल्पना देविदास माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसाडे, जिल्हा जळगाव; सुरेंद्र गंगाधर कुडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी, जिल्हा नांदेड; महेंद्र प्रेमलाल सोनेवाने, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळा, जिल्हा नागपूर; सुरेश गजाननजी कश्यप, जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी, जिल्हा गोंदिया; संजय विस्तारी येरणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी, जिल्हा चंद्रपूर; अशोक धाडूजी बोरकुटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहुर्ली, जिल्हा गडचिरोली; दिलीप रावजी नाकाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतानपार, जिल्हा गडचिरोली; जितेंद्र सत्यनारायणजी राठी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादेही, जिल्हा अमरावती; दीपक वसंतराव पडोळे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, घोन्सी केंद्र केळापूर, जिल्हा यवतमाळ;

थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

श्रीमती प्रेरणा जयवंत शेलवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली, जिल्हा ठाणे; श्रीमती वृषाली सुनील कडलग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धांदरफळ बुद्रुक, जिल्हा अहमदनगर; श्रीमती कुंदा जयवंत बच्छाव, महानगरपालिका शाळा क्रमांक 18, आनंदवली, नाशिक; श्रीमती नकुशी पांडुरंग देवकर, विद्या मंदिर बाचणी, जिल्हा कोल्हापूर; डॉ. सविता जयंत मुळे. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, सरस्वती नगर, औरंगाबाद; श्रीमती शेख वजात नौशिन शेख हमीदोद्दीन, जिल्हा परिषद उच्च शाळा येळेगाव, जिल्हा नांदेड; श्रीमती दीप्ती चंदनसिंह बिष्ट, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा महानगरपालिका वेटरनरी कॉलेज, नागपूर; श्रीमती अंजली भवानीशंकर देव, मनीबाई गुजराती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय अंबापेठ, जिल्हा अमरावती.

विशेष शिक्षक (कला)

महादेव शरणाप्पा खळूरे, यशवंत विद्यालय फुलेनगर अहमदपूर, जिल्हा लातूर.

विशेष शिक्षक (क्रीडा)

शिवाजी पांडुरंग पाटील, स्वातंत्र्य सैनिक मारूती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे, जिल्हा कोल्हापूर.

दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक

छगन पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे, जिल्हा जळगाव.

शिक्षक (स्काऊट)

बालासाहेब मोहनराव चिवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला खुर्द, जिल्हा उस्मानाबाद.

शिक्षक (गाईड)

श्रीमती वर्षा हिरामण दळवी, रायगड जिल्हा परिषद शाळा वराठी, जिल्हा रायगड.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here