तरुणांनी वर्गणी मागितली; व्यक्तीने नकार दिल्याने चढला पारा, अन् नंतर घडलं धक्कादायक कृत्य

तरुणांनी वर्गणी मागितली; व्यक्तीने नकार दिल्याने चढला पारा, अन् नंतर घडलं धक्कादायक कृत्य

पुणे: गणपतीसाठी वर्गणी दिली नाही म्हणून तिघांनी मिळून एकाला लाकडी बांबूने मारहाण केल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील सेवक वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वाल्मिकी (३०), प्रतिक मल्हारी (२३, रा. दोघे. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (२५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तिहेरी अपघात! जेवणासाठी धाब्यावर जाण्याचा मित्रांचा बेत; मात्र रस्त्यातच नियतीने साधला डाव, अन्…
याबाबत कृष्णा किशोर तांबोळी (३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तांबोळी आणि वाल्मिकी, मल्हारी हे वसाहतीमध्ये राहण्यास आहेत. आरोपी आणि तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महिला वसतिगृहातील वीर गोगादेव मंदिराजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. आरोपींनी तक्रारदाराकडे गणपतीच्या वर्गणीवरून हुज्जत घातली.

खेळवले न जाता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, मी तुमच्यासोबत; आमदार निलंगेकर पाटलांचं आश्वासन

वाल्मिकी आणि मल्हारी यांनी फिर्यादीकडे गणपती मंडळासाठी वर्गणीची मागणी केली. यावेळी फिर्यादीने वर्गणी देण्यास नकार दिला. मी मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे फिर्यादीने सांगितले. मात्र, याचा राग आल्याने वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी फिर्यादीला बांबूने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या हाताच्या कोपराला लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here