पुण्यात टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

पुण्यात टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

पुणे: शिरूर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव ढमढेरे परिसरातील तोडकरवस्ती या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
नियतीचा खेळ! कमी वयात कुटुंबाचा गाडा ओढला; ८ महिन्यांपूर्वीच लग्न, पण कामावर जातानाच घडला अनर्थ, अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कारमधील कविता बोरुडे (४०), योगिता बोरुडे (४०) आणि कारचालक राजू शिंदे (२५, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील किशोरी बोरुडे (१७) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे असे तिघे जखमी झाले आहेत. आज सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर असणाऱ्या तोडकर वस्ती येथे वेगात असलेले टेम्पो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जन गंभीर जखमी झालेले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

फुलंब्रीतील सरपंचानंतर आणखी एका आंदोलकाने स्वत:ची दुचाकी पेटवली, सरकारला खणखणीत इशारा!

या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. अपघातात अनेकांना आपले प्राण देखील गमाववे लागले आहेत. अचानक झालेल्या अपघातानं सर्वांची एकच तारांबळ उडाली होती. अपघात नेमका कुठल्या कारणामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून घटनस्थळाचा पंचनामा केला आसून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आलेले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या अधिक तपास पोलीस करत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here