मुलगी घरी वाट बघत होती; काम आटपून घरी निघाले, वाटेतच अनर्थ घडला अन् लाडका बाबा दुरावला

मुलगी घरी वाट बघत होती; काम आटपून घरी निघाले, वाटेतच अनर्थ घडला अन् लाडका बाबा दुरावला

पुणे: भोर तालुक्यातून भोर-आंबाडखिंड मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. भोर-आंबाडखिंड मार्गावर जेधेवाडी ता. भोर मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार हरपला असल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. लक्ष्मण परशुराम थोपटे (४८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. थोपटे हे घरात कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या घरी आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याचं लेकरांना वचन, परतत असताना नियतीने साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील पोळवाडी फाट्यावर लक्ष्मण थोपटे हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी येत होते. जेधेवाडी येथे जात असताना भोर-आंबाडखिंड मार्गावर पोळवाडी फाट्यानजीक मांढरदेवीकडून येणाऱ्या भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात थोपटे हे रस्त्यावरच कोसळले. या मार्गावरून जाणाऱ्या तरुणांनी तात्काळ थोपटे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धुळ्यात डिझेल टँकर रस्त्यात उलटला, डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

अज्ञात चारचाकी वाहनावर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी वाहनाचा शोध सुरू आहे. थोपटे हे खाजगी कंपनीत कामाला होते. अचानक घडलेल्या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण हे घराचा आधार होते. त्यांच्यावर सर्व कुटुंब अवलंबून होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. मात्र काही वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झाले आहे. मात्र आता मुलगाही गेल्याने आई पत्नी आणि मुलीवर आघात झाला आहे. कुटुंबाचा आधार गेल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here