महिला बचतगटांच्या राखी, गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

महिला बचतगटांच्या राखी, गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २५ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांनी राख्या तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलची मांडणी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात केली आहे. या स्टॉलचे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बचतगटांच्या महिला सदस्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड यावेळी उपस्थित होत्या.

महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, घाटकोपर, मुंबई व अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तनिष्का लोकसंचलित साधन केंद्र, धारावी यांनी राख्या, पर्स, बॅग आणि  बांबू संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र स्थित चिचपल्ली, तालुका पोंभुर्णा,  जिल्हा चंद्रपूर यांनी तयार केलेल्या राख्यांचे दोन स्टॉल मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन मंगळवार दि. २९ ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here