धक्कादायक! अंगावर कर्जाचा बोजा; ठेकेदार नैराश्यात, अन् उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

धक्कादायक! अंगावर कर्जाचा बोजा; ठेकेदार नैराश्यात, अन् उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

रत्नागिरी: चिपळूण शहरातील शंकरवाडीतील रहिवासी आणि प्रसिद्ध ठेकेदार सुरज रत्नाकर डांगे उर्फ नाना (४३, शंकरवाडी, चिपळूण) याचा मृतदेह चिपळूण येथे रेल्वे ट्रॅकजवळ मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यू आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत. चिपळूण रेल्वे सुरक्षा पोलीस जगदीश अर्जुन चंद्रशेखर यांना डांगे हे जखमी झालेले मृतावस्थेत दिसले. त्यांच्या अंगावरून रेल्वे गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तरुणाने अचानक सोडलं घर; सगळीकडे शोधाशोध, ७ दिवसांनंतर धक्कादायक दृश्य पाहून सगळेच हादरले
रेल्वे पोलीस जगदीश चंद्रशेखर यांनी या घटनेची खबर तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. परिसरातील लोकांनी हा मृतदेह कोणाचा आहे ते ओळखले होते. तसेच त्यांच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरून ठेकेदार डांगे यांचाच हा मृतदेह असल्याचे निश्चित झाले आहे. ही दुर्दैवी घटना २४ ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ठेकेदार असलेले डांगे यांच्यावरती कर्जाचा मोठा बोजा होता. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

नातसून, पणतू जपतात कवियत्री बहिणाबाईंच्या आठवणी, वास्तव्य केलेल्या घरात कविता अन् भांड्यांचा संग्रह

ही घटना घडली त्याआधी कोकण रेल्वे मार्गावरून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर पास झाली होती. चिपळूण पोलीस स्थानकात या घटनेची खबर मिळताच चिपळूण पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. नाना डांगे हे सुस्वभावी तरुण व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना परिचित होते. येथील ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष असलेले रणजित डांगे यांचा तो लहान बंधू आहेत. नाना डांगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास चिपळूणच्या पोलीस उपनिरीक्षक सुधा चव्हाण करत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here