मानकापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत १९ ऑगस्टच्या सायंकाळी झिंगाबाई टाकळी परिसरातील झेंडा चौक येथे गस्त घालत असताना पोलिसांना विजयसाईवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याच्याकडील कॉलेज बॅगमध्ये ३ किलो ९० ग्रॅम गांजा सापडला. याची किंमत ४६ हजारांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी विजयसाईकडून मोबाइल, बॅग, रोख यासह एकूण ५६ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गांजातस्करीबाबत त्याची विचारपूस केली जात आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे, पोलिस उपनिरीक्षक मनोज राऊत, पोलिस हवालदार शैलेश डोबोले, विजय यादव, प्रदीप पवार, मनोज नेवारे, पवन गजभिये, विजय गिरी, विवेक अढाऊ, सूरज भानावत, रोहित काळे, सहदेव चिखले, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर, अनुप यादव, राहुल पाटील यांच्या चमूने केली.