सहकार मंत्र्यांच्या गावात वैद्यकीय सेवेचा बोजवारा; शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले सतरंजीवर

सहकार मंत्र्यांच्या गावात वैद्यकीय सेवेचा बोजवारा; शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले सतरंजीवर

पुणे: सर्व दृष्टीने विकसित असणाऱ्या पुणे जिल्ह्याचे नाव जगात घेतले जाते. त्यात उत्तर पुणे जिल्हा तसा विकसित मानला जातो. मात्र आज आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या निरगुडसर आरोग्य केंद्रातून एका धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील आरोग्य केंद्रात दिवसभर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर चक्क जमिनीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावातील हे आरोग्य केंद्र असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शाळेत हजार विद्यार्थी; मात्र इमारत धोकादायक स्थितीत, संस्थाचालकाचे दुर्लक्ष, पालकांचे मोठं पाऊल
आंबेगाव तालुका हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खुद्द दिलीप वळसे पाटील यांचे हे गाव असून त्यांच्या गावातील हा प्रकार समोर आला आहे. साधारण एकूण ४८ महिला त्यापैकी ३० निरगुडसर आणि १८ धामणी आरोग्य केंद्राच्या आज शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलांना खाली जमिनीवर झोपवण्यात आले होते. याबाबत संबधित रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सरकार म्हणते शासन आमच्या दारी मात्र या आरोग्य केंद्रात साध्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. आज शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना योग्य सुविधा मिळत नसतील तर सोबत आलेल्या नातेवाइकांचे तर मोठे हाल होत आहेत. कुणासोबत लहान मूल असल्याने त्यांना साधे पाणी देखील प्यायला नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, २५० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट

एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असतील तर पेशंटची सोय बघणे देखील तितकेच गरजेचे आहे. पेशंटला गाद्या नसून सतरंजीवर झोपवण्यात आले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत डॉ. शारदा मोरमारे यांनी सांगितले की, आज एकूण ४८ महिलांचे शस्त्रक्रिया झाल्या असून ऑपरेशनच्या पेशंटला भूल असल्याने आम्ही त्यांना गाद्या टाकून खाली झोपवले आहे. आम्ही दर महिन्याला अशा शस्त्रक्रिया करतो आणि अशाच प्रकारे आम्ही त्यांना खाली झोपवतो. कारण त्यांना भूल दिलेली असते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here