पुण्यात धक्कादायक घटना; ज्येष्ठ महिलेला मुलींची मारहाण, अंगावर बसून, केस ओढले

पुण्यात धक्कादायक घटना; ज्येष्ठ महिलेला मुलींची मारहाण, अंगावर बसून, केस ओढले

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेला तिच्या अंगावर बसून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या संदर्भात पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शिक्रापूर परिसरात असणाऱ्या एका घराच्या बोळामध्ये एका ज्येष्ठ महिलेला दोन बहिणी मारत असल्याचे पहायला मिळत आहे. त्या दोन मुली सख्ख्या बहिणी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्या.मुलींची आई देखील सहभागी असल्याची माहिती समोर येत असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झाला आहे.

या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या ज्येष्ठ महिलेला खाली पाडून तिचे केस ओढून तिला मारहाण करत असल्याचे व्हिडीओत पहायला मिळत आहे. यामध्ये दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांची आई सहभागी असल्याची माहिती समोर येत असून मारहाण करण्यात आलेली ज्येष्ठ महिला ही त्यांच्या शेजारी राहणारी असल्याचे समोर येत आहे.

या मारहाणीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here